शासकीय कर्मचारी इ.कर्ज वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे बाबतचा सविस्तर शासन निर्णय |
महाराष्ट्र :
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि.26.07.2022 रोजी विधी व न्याय विभागाचा अग्रिमे मंजुर करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. सन 2022-23 या अर्थसंकल्पीय अनुदान मागणी, शासकीय कर्मचारी इ.कर्ज वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे बाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात.
शासकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे या लेखाशिर्षाखाली संगणक खरेदीसाठी अग्रिमे मंजुर करण्यात येते. सन 2022-23 या अर्थसंकल्पीय वर्षाकरीता 300,000/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने सदर निर्णयान्वये मंजुरी दिली आहे .यासाठी विविध अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अधिकारी / कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक विचारात घेवून कर्मचाऱ्यांयना अग्रिम मंजुरीचे आदेश काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर अग्रिमे कर्मचाऱ्याने त्याच कारणासाठी वापरल्याचे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील. संगणकाची किंमत अग्रिमापेक्षा कमी असल्यास, संगणकाच्या किंमती ऐवढीच अग्रिम मंजुर करण्यात येते.
ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांने सदर अग्रिमाचा लाभ घेतला असेल अशा कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकामध्ये नोंद् घेणे आवश्यक राहील. संगणक अग्रिमाची वसुली शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जे 204- इतर आगाऊ रक्कमा या जमा शिर्षाखाली जमा करण्यात येते. याबाबतचा विधी व न्याय विभागाचा दि.26.07.2022 शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक -202207261542279912 ) खालील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करु शकता.
शासन निर्णय PDF |
No comments:
Post a Comment