राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱयांना वर्षातून एकदाआरोग्य तपासणी , सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा.
राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱयांना वर्षातून एकदाआरोग्य तपासणी
सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा.

महाराष्ट्र : सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा.

राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱयांचे वय 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा आणि 50 ते 60 वयोगटात दोन वेळा संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी 250 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे . तसेच महाराष्ट्रात नागरीकरण वाढत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने नगरपंचायती आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत केली .

अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेला उत्तर देताना राजेश टोपे बोलत होते . नागरी भागातील लोकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नगरपंचायतीमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारणार आहोत . पालिका क्षेत्रात 15 हजार लोकसंख्येला आरोग्य सुविधेसाठी केंद्र उभारण्यात येईल , असे टोपे यांनी जाहीर केले . तालुक्याच्या ठिकाणी रक्तघटकांची तपासणी करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे . जिह्याच्या ठिकाणी एमआरआय मशीन बसवण्यात येणार आहे . 100 खाटांच्या रुग्णालयांत सिटीस्कॅन यंत्रणा बसवण्यात येईल , अशी घोषणाही टोपे यांनी केली . प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग निदान मोबाईल व्हॅन तैनात करण्यात येणार आहे .

सरकारी रुग्णालयांत यंत्रांद्वारे स्वच्छता होणार

सरकारी रुग्णालयांतील अस्वच्छता हा लोकांसाठी चिंतेचा विषय असतो . त्यामुळेच अनेक लोक आर्थिकदृष्टय़ा परवडत नसतानाही खासगी रुग्णालयांत जातात . या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत दिवसातून दोन ते तीनवेळा यंत्रांद्वारे स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे . त्याचबरोबर अंथरूण - पांघरूण धुण्यासाठी यंत्रसामुग्री देण्यात येईल , असेही राजेश टोपे यांनी जाहीर केले .


For more interesting post like it please visit again at www.baseers creation.com

No comments:

Post a Comment