शिक्षकांची 'पात्रता' पुन्हा तपासणार,नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार

 

नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार
शिक्षकांची 'पात्रता' पुन्हा तपासणार,नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार

परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उमेदवारांना पात्र ठरविण्यासाठी केलेला गैरव्यवहार उघड झाल्यानंतर आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने टीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि शाळेत नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांची चौकशी सुरू केली आहे.

त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्ती मिळालेले शिक्षक आणि टीईटीत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडील मूळ प्रमाणपत्रे शिक्षणाधिकाऱयांकडे जमा करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.


पैसे देऊन टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक उमेदवारांनी अनुदानित शाळेत नियुक्ती मिळवल्याचा शालेय शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळे सर्व माध्यमांच्या शाळांमधून 13 फेब्रुवारी 2013 नंतर शिक्षकपदी नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रमाणपत्र जमा करण्यास टाळाटाळ करणाऱया उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे.


30 मार्चपर्यंत मुदत द्या.


टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी शिक्षण विभागाने 30 मार्चपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष संतोष मगर यांनी केली आहे. फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेले परंतु वैयक्तिक मान्यता प्रलंबित असणाऱया शिक्षकांच्या बाबतीत शाळांनी टीईटी प्रमाणपत्राच्या सत्यतेबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे. तसेच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेपूर्वी टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी अनिवार्य करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही संतोष मगर यांनी सांगितले.No comments:

Post a Comment